मित्रांनो काय करणार आहात weekend ला? नक्कीच एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणार असाल ... जर असे planning असेल तर Nagartas Fall ला भेट द्या एकदा या पावसाळ्यात ....
होय! बेळगांव-आंबोली मार्गावरून आज-याकडे जाणा-या वळणाच्या थोड़े आधी हा Nagartas Fall पहायला मिळतो. चंदगडहून साधारण वीस-बावीस किलोमीटरवर हा सुंदर Fall दिसतो. निसर्गातलं सौंदर्य कदाचित शब्द्बबध्द करता येणार नाही, परंतु ते सौंदर्य मनाला भुरळ घातल्याशिवाय राहात नाही. असं सांगितलं जातं की या fall पासून थोडयाच अंतरावर असलेल्या छोट्या गावाचं रक्षण करणारा क्षेत्रपाल या ठिकाणी पण अदृश्य स्वरूपात वास करतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी या fall जवळ बांधलेल्या तीनही बाजूनी उघड्या असलेल्या छोट्याश्या देवळात कोणी राहात नाही. अर्थात लोकांची ही श्रद्धा आहे.
या fall जवळ इतर कोणतीही इमारत वा दुसरे कसले बांधकाम नाही. त्याच्या आजूबाजूस दाट झाडी, उंच डोंगर दिसतात. डाव्या बाजुला रस्ता, त्या बाजूला हिरव्यागार रंगानी नटलेले डोंगर मोठं विलोभनीय दृश्य दिसतं हे fall आणि त्यामुळे निर्माण झालेली घळ पाहण्यासाठी तीन ठिकाणी पाय-या, कठडे आणि लोखंडी रेलिंग्ज्स केलेले आहेत. इथे जाउन पाहिल्यावर चिंचोली, खोSSल दरी पाहता येते. पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त की त्या मा-याने काळा कातळही चिरत जाउन अरुंद पण खोल घळ निर्माण झालेली आहे. ही घळ इतकी अरुंद आहे की एखादा जाड़ा माणूस खाली पडला तरी मधेच अडकण्याची दाट शक्यता. Fall मधून कोसळताना पाणीही शुभ्र अगदी दुधासारखे दिसते .... fall च्या मागे सपाट भागावरून पाणी वाहात येताना आजुबाजूचे वृक्ष आपली छाया त्यात पाहात असावेत, असे वाटते. Fall कोसळताना उडणारे तुषार पाहताना पाण्याचा प्रवाह खाली वाहतो आहे, असे वाटतच नाही.
निसर्गाचा सहवास कशाही रुपात लाभों, त्याचा आनंद आणि समाधान मिळाल्याशिवाय रहात नाही. अंबोलिचा Fall रस्त्याकडेच्या उंच डोंगरावरून खाली कोसळतो. तसाच नांगरतास Fall रस्त्याच्या दुस-या बाजूस असलेल्या खोल दरीत रस्त्याच्या समांतर खाली कोसळतो. हा Fall केव्हा आणि कसा आकारला गेला असावा, हे समजणे कठीण. ३० जून ... सायंकाळची वेळ .... पावसाची रिमझिम चालूच होती. रस्त्यावर वाहतूक विरळच होती. पडणा-या पाण्याचा आवाज दरीत घुमत होता. त्या आवाजावर आजूबाजूचे जंगल डोलत उभे होते. रस्त्याच्या कडेच्या गर्द झाडीतून चिमण्यांचा चिवचिवाट स्पष्टपणे ऐकू येत होता. पांढुरक्या ढ्गातून सायंकाळच्या सूर्याची किरणं झिरपत होती. डोंगर उतारावर कोवळे हिरवे पोपटी रंगाचे लुसलुशित गवत हसत होते. त्रृणफुले विविध रंगानी सजली होती. आजूबाजूची झाडे त्याकडे पाहून हसत होती. हवेतला गारवा मनाला सुखद वाटत होता. जेव्हा माणूस अस्तित्वात नव्हता, तेव्हादेखिल हा निसर्ग असाच असणार, नद्या, नाले असेच वहात असणार. म्हणजे निसर्ग फक्त माणसासाठी नाहीच. तो सर्व पशु, पक्षी, छोटी छोटी फुलपाखरे यासाठी आहे, हे खरे. परंतू निसर्ग फक्त माणसासाठी निर्माण झाला असे मानून, त्यावर सत्ता प्रस्थापित करण्याचा मोह माणसाला आवरता येत नाही आहे.
जंगलतोड करुन, नद्यानाले मुजवून डोंगर खोदून मानवी वसाहत अस्तित्वात येऊ लागल्यामुळे जंगलांना, निसर्गाला फार मोठा धोका निर्माण होऊ लागला आहे, असे दिसते. निसर्गापासून मिळणारे समाधान आता दुर्मिळ होत चालले आहे. निसर्गातील अनेक पक्ष्यांच्या प्रजाति नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही नष्ट झाल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडू लागला आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. वृक्षतोड जितक्या जोमाने घडते आहे तितक्या जोमाने वृक्ष लागवड होताना दिसत नाही. वाढणारी लोकसंख्या आणि जागेची टंचाई या गोष्टी धरल्या, तरी अजूनही खूप भाग वृक्षसंवर्धनासाठी जागा आहे. या उपलब्ध जागांचा व्यवस्थित उपयोग करुन त्यावर वृक्षसंवर्धन कार्यक्रम राबविल्यास बराच उपयोग होईल.
असो, पण तुम्ही मात्र ही Nagartas Fall पहाण्याची संधि सोडू नका एवढेच...!!!
Nagartas Fall बद्दल इथे क्लिक करा.