अब्जावासे नमस्तुभ्यं चपलायै नमो नम:|
चंचलाई नमस्तुभ्यं ललितायै नमो नम: ||
चंचलाई नमस्तुभ्यं ललितायै नमो नम: ||
श्री शांतादुर्गादेवी कवळे येथील दर्शन आटोपून आम्ही श्री शांतादुर्गा देवी कुंकळळीकरीण, फातर्पा इथे दर्शनासाठी येउन पोहोचलो. श्री शांतादुर्गा वेगवेगळ्या रूपात समावलेली आहे. (Shree Shantadurga Fatorpa) श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीणचे स्वरूप महिषासूर मर्दिनिचे असून हातात ढाल, तलवार, त्रिशूल व भाला ही आयुधे असून पायाजवळ रेडा आहे. तसेच सामर्थ्याचे प्रतिक असलेला सिंह तिचे वाहन. अशी ही चैतन्यमय महामाया चांदी, सोने, मोती, ही-याच्या अलंकाराने लखलखणारी शक्ति पाहून भाविकांसमोर प्रकट झाल्याचा भास् होतो.
मखरोत्सवाची सजावट करण्यासाठी मंदिराच्या चौकावर अंत्रालयाच्या द्वारासमोर छताला जाड लोखंडी आडवी दांडी बसवून जाड आकड्याला मखर टांगले जाते. या मखराची सजावट पारंपारिक दैवज्ञांकडून केली जाई. श्री शांतादुर्गा देवी कुंकळळीकरीणच्या दर्शनाला येणारे भाविक कळसाचे दर्शन घेउन मंदिराच्या पाय-यांना नमस्कार करून आपले लक्ष देवीच्या चरणाकडे केंद्रित करून कृपादृष्टि ठेवण्याची प्रार्थना करतात.
पंचमीच्या दिवशी भव्यदिव्य मखर रंगीबेरंगी फुलांनी व विद्युत् रोषणाईने सजवून देवीची उत्सवमूर्ती मखराच्या मध्यभागी बसवली जाते. पंचमी ते महानवमीला मंदिरामधिल उत्सवी वातावरणास भजन, पुराण, किर्तनाने सुरूवात होते. दसरोत्सवापर्यंत हा ओसंड़ता उत्साह भाविकांच्या तनामनाला वेड लावून जातो. पंचमी ते नवमीपर्यंत प्रत्येक रात्री मखरातिल देवी सिंहारूढ झालेली असून महिषासूराचा वध करताना उग्र रूपात सामावलेली असते. उत्सवाची सुरूवात रात्री आकार उदंगीला तूप-साखरेचा नैवैद्य दाखवून, मंदिरात पुराण वाचून श्री खंडेरायाची वाजंत्रिच्या तालसुराने पालखीची मिरवणूक मंदिराभोवती काढली जाते. त्यानंतर गाभा-यातील देवीच्या मूर्तीची आरती होते. पुरोहित देवीची आरती करतो. समोरून चौकावर दोन्ही बाजुंनी बारा वांगडी भाविक बसलेले असतात. शहनाई, कासाळे, ढोल, ताशे या पारंपारिक वाद्द्यांच्या तालावर भव्यदिव्य मखर झुलवले जाते.
आपण सर्वांनी या नवरात्रोत्सवात Shree Shantadurga Fatorpa श्री शांतादुर्गादेवी कुंकळळीकरीण फातर्पा इथे भेट द्यावी.
No comments:
Post a Comment