या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ||
मित्रांनो,

अध्यात्म आणि शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपल्या घराशेजारीच मंदिरे उभारली. त्यांच्या वसाहती या प्रामुख्याने सासष्टी तालुक्यातच होत्या. याच दरम्यान मध्य भारतातून काही लोक इथे आले आणि त्यांनी श्री महालक्ष्मीच्या मूर्ती आणल्या. तेही कोकण भागात स्थायिक झाले आणि त्यांनी मंदिरातून महालक्ष्मीची मूर्ती स्थापन केली. काळ मागे पडत गेला तसा हे लोक इकडे तिकडे पसरले. त्यानी कट्टा बाळळी सारख्या जंगलमय प्रदेशाचा आश्रय घेतला.
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ||
मित्रांनो,
आज या अंकात आपण बाळळी येथील श्री महालक्ष्मी देवीची माहिती करुन घेउयात. परशुरामाने अरबी समुद्र बाणाच्या साह्हायाने हटवून कोकण भूमी निर्माण केली हे मिथक प्रसिद्ध आहे. शूर्पण देश म्हणून ती प्रसिद्ध होती. त्याला स्पतकोकण असेही म्हणण्यात येई. अपरान्त हे महासप्तम या शब्दाचे प्राकृत नाम. आर्य लोक उत्तर भारतातून आपल्या देवतांसह नवीन ठिकाणी वास्तव्याला आले. त्यांनी शांतता मिळावी म्हणून येथे नव्या वसाहती निर्माण केल्या. या ठिकाणी आलेल्या देवांनी आपल्याबरोबर आपल्या कुलदेवतांबरोबरच आपल्या इतर देवदेवतांनाही आणले. या बहुतेक वसाहती नदी किनारी किंवा तळींच्या जवळ निर्माण झाल्या. त्याचं कारण त्यांची उपजीविका चालविणारी शेती त्यांना करता यावी.

अध्यात्म आणि शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपल्या घराशेजारीच मंदिरे उभारली. त्यांच्या वसाहती या प्रामुख्याने सासष्टी तालुक्यातच होत्या. याच दरम्यान मध्य भारतातून काही लोक इथे आले आणि त्यांनी श्री महालक्ष्मीच्या मूर्ती आणल्या. तेही कोकण भागात स्थायिक झाले आणि त्यांनी मंदिरातून महालक्ष्मीची मूर्ती स्थापन केली. काळ मागे पडत गेला तसा हे लोक इकडे तिकडे पसरले. त्यानी कट्टा बाळळी सारख्या जंगलमय प्रदेशाचा आश्रय घेतला.
No comments:
Post a Comment