Wednesday, October 5, 2011

Goa : Shri Navdurga Devi, Paingin (श्री नवदुर्गा देवी, पैंगीण, गोवा)

|| नवमं सिद्दीदात्री नवदुर्गा: प्रकीर्तिता:
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हणैव महात्मना ||



मित्रांनो,

पैंगीणच्या महालवाड्यावर श्री नवदुर्गा देवीचे मंदिर आहे. या देवीला स्थानिक लोक फ़क्त "देवती" या नावाने ओलख़तात. मंदिराच्या गर्भकुडीत असलेली ही देवीची मूर्ती मध्यमयुगीन सुंदर आहे. ही देवी चतुर्भुज असून महिषासूरमर्दिनीरूपी आहे. या मूर्तीवर कदंब मूर्तिशैलिचा प्रभाव थोडाफार दिसून येतो. कारागिराने देवीची मुद्रा, मूर्तीचे अलंकार बाकीचे तपशील कदंब शैलीत कोरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. येथे नवरात्रित गोंधळ नावाचा प्रकार होतो. या देवीची प्रतीके म्हणून 'सत्री', तर स्थानिक देवांचे प्रतिक म्हणून 'तरंगे' 'पिल्लाकुचो' यांची उपासना केलि जाते.

एका विशिष्ट लाकडाच्या गोल दांड्याला छत्रीच्या आकाराचे तिन थर चढवले जातात. या छत्र्या पांढ-या रंगाच्या कापडाच्या बनवितात. या तिन छत्र्यांखाली नऊवारी कापडांना विशिष्ट पद्धतीने नि-या काढून घट्ट बांधली जाते. याला सत्री किंवा 'देवतेची सत्री' म्हणतात.

'पिल्लाकुचो' म्हणजे मोरांच्या पंखांचा मोठा गुच्छा. ही सजविलेली चार प्रतीके घेउन मानकरी आमोणे गावातून वाजत गाजत नवरात्रीच्यापूर्वी पैंगीणच्या श्री नवदुर्गा मंदिरात आणतात. नवरात्रित डोक्यावर 'मुंडासो' धोतर असा वेश परिधान केलेला भगत या प्रतिकांसमोर एका विशिष्ट शैलीने तलवार फिरवून तांदूळ मारतो. या दरम्यान ही प्रतीके धरलेल्या मानक-यांवर अवसर येतो. सांगण्यानंतर अवसराचे विसर्जन होते.

दोन तरंगे पिल्लकुचो मंदिरातील तुळशी व्रृंदावनाकडे नेली जातात. तेथे ही प्रतीके भाविकांच्या डोक्याला लावण्याची प्रथा आहे. नंतर दोन तरंगे सत्री मंदिराच्या पटांगणात नेऊन ढोल-ताशांच्या गजरात नाचवली जातात. यालाच गोंधळ किंवा कोकणीत "गोधोल" म्हणतात. ही तरंगे पारंपारिक कपडे परिधान केलेले मानकरीच नाचवितात. या गोंधळाची खासियत म्हणजे येथे राखून ठेवलेली परंपरा.

आपण ही या परंपरेचा मान ठेउयात आणि या नवरात्रित श्री नवदुर्गेचे दर्शन घेऊयात.

No comments: