Showing posts with label गोवा. Show all posts
Showing posts with label गोवा. Show all posts

Thursday, October 6, 2011

Goa : Shri Mahalaxmi Mandir, Balli (श्री महालक्ष्मी मंदिर, बाळळी, गोवा)

Shri Mahalaxmi Devi Balli Goa

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ||

मित्रांनो,

आज या अंकात आपण बाळळी येथील श्री महालक्ष्मी देवीची माहिती करुन घेउयात. परशुरामाने अरबी समुद्र बाणाच्या साह्हायाने हटवून कोकण भूमी निर्माण केली हे मिथक प्रसिद्ध आहे. शूर्पण देश म्हणून ती प्रसिद्ध होती. त्याला स्पतकोकण असेही म्हणण्यात येई. अपरान्त हे महासप्तम या शब्दाचे प्राकृत नाम. आर्य लोक उत्तर भारतातून आपल्या देवतांसह नवीन ठिकाणी वास्तव्याला आले. त्यांनी शांतता मिळावी म्हणून येथे नव्या वसाहती निर्माण केल्या. या ठिकाणी आलेल्या देवांनी आपल्याबरोबर आपल्या कुलदेवतांबरोबरच आपल्या इतर देवदेवतांनाही आणले. या बहुतेक वसाहती नदी किनारी किंवा तळींच्या जवळ निर्माण झाल्या. त्याचं कारण त्यांची उपजीविका चालविणारी शेती त्यांना करता यावी.

Shri Mahalaxmi Devi Temple Balli Goa

अध्यात्म
आणि शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपल्या घराशेजारीच मंदिरे उभारली. त्यांच्या वसाहती या प्रामुख्याने सासष्टी तालुक्यातच होत्या. याच दरम्यान मध्य भारतातून काही लोक इथे आले आणि त्यांनी श्री महालक्ष्मीच्या मूर्ती आणल्या. तेही कोकण भागात स्थायिक झाले आणि त्यांनी मंदिरातून महालक्ष्मीची मूर्ती स्थापन केली. काळ मागे पडत गेला तसा हे लोक इकडे तिकडे पसरले. त्यानी कट्टा बाळळी सारख्या जंगलमय प्रदेशाचा आश्रय घेतला.

येथील अद्यात्मिक वातावरण हे त्याचं प्रमुख कारण. गोवा मुक्तीनंतर महालक्ष्मीच्या भक्तगणांनी ज्या घरात महालक्ष्मीची पूजा होत असे तिथे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी महालक्ष्मी सेवा समिति स्थापन केली. त्यांचा उद्देश्य शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा होता. या मंदिराची आणि आवाराची जुन्या वास्तुशास्त्राप्रमाणे ४६०० चौ. मी. जागेत उभारणी करण्यात येणार आहे. सद्ध्या मंदिराचे बांधकाम झालेले असून इतर अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. आपणही आपल्या परीने शक्य होइल तो सहकार्य करावे.

Wednesday, October 5, 2011

Goa : Shri Navdurga Devi, Paingin (श्री नवदुर्गा देवी, पैंगीण, गोवा)

|| नवमं सिद्दीदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हणैव महात्मना ||



मित्रांनो,

पैंगीणच्या महालवाड्यावर श्री नवदुर्गा देवीचे मंदिर आहे. या देवीला स्थानिक लोक फ़क्त "देवती" या नावाने ओलख़तात. मंदिराच्या गर्भकुडीत असलेली ही देवीची मूर्ती मध्यमयुगीन व सुंदर आहे. ही देवी चतुर्भुज असून महिषासूरमर्दिनीरूपी आहे. या मूर्तीवर कदंब मूर्तिशैलिचा प्रभाव थोडाफार दिसून येतो. कारागिराने देवीची मुद्रा, मूर्तीचे अलंकार व बाकीचे तपशील कदंब शैलीत कोरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. येथे नवरात्रित गोंधळ नावाचा प्रकार होतो. या देवीची प्रतीके म्हणून 'सत्री', तर स्थानिक देवांचे प्रतिक म्हणून 'तरंगे' व 'पिल्लाकुचो' यांची उपासना केलि जाते.

एका विशिष्ट लाकडाच्या गोल दांड्याला छत्रीच्या आकाराचे तिन थर चढवले जातात. या छत्र्या पांढ-या रंगाच्या कापडाच्या बनवितात. या तिन छत्र्यांखाली नऊवारी कापडांना विशिष्ट पद्धतीने नि-या काढून घट्ट बांधली जाते. याला सत्री किंवा 'देवतेची सत्री' म्हणतात.

'पिल्लाकुचो' म्हणजे मोरांच्या पंखांचा मोठा गुच्छा. ही सजविलेली चार प्रतीके घेउन मानकरी आमोणे गावातून वाजत गाजत नवरात्रीच्यापूर्वी पैंगीणच्या श्री नवदुर्गा मंदिरात आणतात. नवरात्रित डोक्यावर 'मुंडासो' व धोतर असा वेश परिधान केलेला भगत या प्रतिकांसमोर एका विशिष्ट शैलीने तलवार फिरवून तांदूळ मारतो. या दरम्यान ही प्रतीके धरलेल्या मानक-यांवर अवसर येतो. सांगण्यानंतर अवसराचे विसर्जन होते.

दोन तरंगे व पिल्लकुचो मंदिरातील तुळशी व्रृंदावनाकडे नेली जातात. तेथे ही प्रतीके भाविकांच्या डोक्याला लावण्याची प्रथा आहे. नंतर दोन तरंगे व सत्री मंदिराच्या पटांगणात नेऊन ढोल-ताशांच्या गजरात नाचवली जातात. यालाच गोंधळ किंवा कोकणीत "गोधोल" म्हणतात. ही तरंगे पारंपारिक कपडे परिधान केलेले मानकरीच नाचवितात. या गोंधळाची खासियत म्हणजे येथे राखून ठेवलेली परंपरा.

आपण ही या परंपरेचा मान ठेउयात आणि या नवरात्रित श्री नवदुर्गेचे दर्शन घेऊयात.

Friday, September 30, 2011

Goa : Shri Shantadurga Kavlem (श्री शांतादुर्गा कवळे, गोवा)

|| सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोSस्तुते ||

shree shantadurga devi kawale
श्रीशांता विजयपदा विजयते दुर्गा हृदा तां भजे |
कुद्धौ शान्तियुतो कृतो हरिहरो कृत्वाSधिहस्ते यया ||
शांताये च नमो नमो नहि परं यस्या ममाSलंबनम |
शांताया खलु किकरोSस्मी स्मतां तत्पादयोर्मे मना ||


shri shantadurgadevi kawaleमित्रांनो,

लवकरच नवरात्रीचे पर्व सुरु होत आहे. आपणा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मन:पुर्वक शुभेच्छा. आज संध्याकाळी मी, माझी फॅमिली आणि माझा मित्र गिरीश पालेकर फॅमिलीसह श्री शांतादुर्गादेवी, कवळे (Shree Shantadurgadevi, Kavlem, Goa) आणि श्री शांतादुर्गा देवी कुंकळळीकरीण, फातर्पा या ठिकाणी दर्शनाचा योग आला.

गोव्यातील सर्व भक्तजनांना नवरात्रीच्या निमित्ताने सहज दर्शनाचा योग आलेला आहे. आम्ही संध्याकाळी श्री शांतादुर्गादेवी, कवळे साठी दर्शनाला निघालो. होय! रस्ता चुकत चुकत गेलो पण शेवटी इच्छित स्थळी जाऊन पोहोचलोत.

shri shantadurga devi kawale goaफोंडा तालुक्यातील कवळे येथील श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर भव्य असून मंदिराची शैली चित्तवेधक आहे. या मंदिराच्या शिख़रावरील मनोरा अष्टकोनी असून बराच उंच आहे. त्यावर गोलाकार घुड आहे. या शिखरासारखे दुसरे शिखर गोव्यात इतर कोणत्याच ठिकाणी आढळत नाही. कवळेच्या मंदिरासमोर एक प्रचंड दीपस्तंभ आहे. त्याच्यामागे एक मोठा तलावदेखिल आहे. या देवीने शिव आणि विष्णू यांच्यामधे निर्माण झालेल्या वादाचे निवारण केले होते, म्हणून या देवीला श्री शांतादुर्गा असे संबोधण्यात आले, असे सांगतात. सध्या मंदिरात असलेली या देवीची मूळ मूर्ती धातुची असून ती समभंग मुद्रेत आहे. सन १८९८ मधे श्री शांतादुर्गेची मूळ मूर्ती पठाणांनी चोरून नेली. नवीन मूर्ती स्थापित करेपर्यंत मंदिराशेजारी असलेल्या गौडपादाचार्य मठातील देवीची मूर्ती या मंदिरात आणून स्थापन करण्यात आली.




१९ मार्च १९०२ साली नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. मठातून आणलेली ती मूर्ती त्याच गर्भग्रृहात ठेवण्यात आली आहे. देवी मूळ सासष्टी तालुक्यातील केळशी किंवा केळोशी गावची १५६० सालच्या पोर्तुगिजांच्या र्धमछळामुळे देवीला फोंडा तालुक्यातील सध्याच्या कवळे गावात आणली. आजदेखिल सासष्टिच्या केळशी गावात या देवीचे प्राचीन स्थळ आहे.

shree shantadurgadevi goa kawaleकवळेचे सध्याचे मंदिर नेमके कधी बांधले, याची नोंद आढळत नाही; पण १८ व्या शतकातसुध्दा या मंदिराची वास्तु उभी असल्याचे पुरावे आढळतात. १७६० साली हे देवालय नरोराम नावाच्या मंत्र्याने बांधून दिले. ते साता-याच्या छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात मंत्रिपद सांभाळत होते. नरोराम यांचे मूळ नाव नरोराम शेणवी. ते वेंगुर्ल्यानजीक असलेल्या कोचरे गावचे. आजदेखिल त्यांचा एखादा वंशज देवीच्या भेटीस आला तर त्याला मोठ्या मानाने देवालयात आणण्याचा परिपाठ आहे.

तर मित्रांनो, या नवरात्रिमधे श्री शांतादुर्गा देवी, कवळे
(Shree Shantadurgadevi, Kavlem, Goa) येथील दर्शन चुकवू नका!

श्री शांतादुर्गादेवी, कवळे फोंडा येथील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमासाठी (Shree Shantadurga navraatri utsav program) इथे क्लीक करा.