Wednesday, October 5, 2011

Goa : Shri Navdurga Devi, Paingin (श्री नवदुर्गा देवी, पैंगीण, गोवा)

|| नवमं सिद्दीदात्री नवदुर्गा: प्रकीर्तिता:
उक्तान्येतानि नामानि ब्रम्हणैव महात्मना ||



मित्रांनो,

पैंगीणच्या महालवाड्यावर श्री नवदुर्गा देवीचे मंदिर आहे. या देवीला स्थानिक लोक फ़क्त "देवती" या नावाने ओलख़तात. मंदिराच्या गर्भकुडीत असलेली ही देवीची मूर्ती मध्यमयुगीन सुंदर आहे. ही देवी चतुर्भुज असून महिषासूरमर्दिनीरूपी आहे. या मूर्तीवर कदंब मूर्तिशैलिचा प्रभाव थोडाफार दिसून येतो. कारागिराने देवीची मुद्रा, मूर्तीचे अलंकार बाकीचे तपशील कदंब शैलीत कोरण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. येथे नवरात्रित गोंधळ नावाचा प्रकार होतो. या देवीची प्रतीके म्हणून 'सत्री', तर स्थानिक देवांचे प्रतिक म्हणून 'तरंगे' 'पिल्लाकुचो' यांची उपासना केलि जाते.

एका विशिष्ट लाकडाच्या गोल दांड्याला छत्रीच्या आकाराचे तिन थर चढवले जातात. या छत्र्या पांढ-या रंगाच्या कापडाच्या बनवितात. या तिन छत्र्यांखाली नऊवारी कापडांना विशिष्ट पद्धतीने नि-या काढून घट्ट बांधली जाते. याला सत्री किंवा 'देवतेची सत्री' म्हणतात.

'पिल्लाकुचो' म्हणजे मोरांच्या पंखांचा मोठा गुच्छा. ही सजविलेली चार प्रतीके घेउन मानकरी आमोणे गावातून वाजत गाजत नवरात्रीच्यापूर्वी पैंगीणच्या श्री नवदुर्गा मंदिरात आणतात. नवरात्रित डोक्यावर 'मुंडासो' धोतर असा वेश परिधान केलेला भगत या प्रतिकांसमोर एका विशिष्ट शैलीने तलवार फिरवून तांदूळ मारतो. या दरम्यान ही प्रतीके धरलेल्या मानक-यांवर अवसर येतो. सांगण्यानंतर अवसराचे विसर्जन होते.

दोन तरंगे पिल्लकुचो मंदिरातील तुळशी व्रृंदावनाकडे नेली जातात. तेथे ही प्रतीके भाविकांच्या डोक्याला लावण्याची प्रथा आहे. नंतर दोन तरंगे सत्री मंदिराच्या पटांगणात नेऊन ढोल-ताशांच्या गजरात नाचवली जातात. यालाच गोंधळ किंवा कोकणीत "गोधोल" म्हणतात. ही तरंगे पारंपारिक कपडे परिधान केलेले मानकरीच नाचवितात. या गोंधळाची खासियत म्हणजे येथे राखून ठेवलेली परंपरा.

आपण ही या परंपरेचा मान ठेउयात आणि या नवरात्रित श्री नवदुर्गेचे दर्शन घेऊयात.

Topamax Lawsuit : All You Must Think On It!

Yeah! I know many of us now very well aware about the birth defects like Cleft Lip and Cleft Palate. It is the truth that has been based on a study conducted by the North American Antiepileptic Drug Pregnancy Registry, women who took Topamax in their first trimester of pregnancy were 11 times more likely to give birth to infants with oral clefts. It means Topamax may cause human endangerment.

Topamax lawsuitSome days back women never get or seek compensation for medical expenses due to the treatment of Topamax during pregnancy. Now it is possible with the help of Topamax lawsuit. Yeah! Just remember one thing here. Surgeries to repair a cleft lip may occur when a child is between 10 weeks and 3 months old, and cleft palate surgeries may occur in children 6 months old through 18 months old. Follow-up surgeries may begin to be performed in children who are 2 years old. If the oral cleft has affected the teeth, a teeth-ridge grafting operation may also be needed.

To carry out further treatment for your child is not possible due to monetary funds. So, it is just reminder to mothers who have already suffered due to such crisis; just call today for a Free Consultation at 877-494-9949 OR at O’Hanlon, McCollom & Demerath – Personal Injury Lawyers – 808 West Avenue, Austin, TX. 78701 – 512-494-9949. They have expertise to help you out in such crisis. Just think!

Tuesday, October 4, 2011

Goa : Shri Navdurga Devi, Bori (श्री नवदुर्गा देवी, बोरी, गोवा)

मित्रांनो, inquisition च्या काळात अनेक दैवतांनी फोंडा तालुक्यात आश्रय घेतला. बोरी गावचे आराध्य दैवत श्री नवदुर्गा त्यापैकीच एक. गोव्यातील सर्वात सुंदर नवदुर्गेची मूर्ती याच गावात आहे. काही लोकांच्या मते ही देवी मूळ सासष्टी तालुक्यातील बाणावली गावची. पोर्तुगीज दस्तऐवजात मात्र तसा उल्लेख सापडत नाही. पण एक मात्र खरे, की बाणावली ख्रिस्ती भाविक असूनही या देवीची उपासना करताना आढळतात.

श्री नवदुर्गा देवीची मूर्ती महिशासूरमर्दिनी रुपी आहे. अशी कोरीव अप्रतिम महिषासूरमर्दिनीची मूर्ती गोव्यात एकमेव असावी. मूर्ती चतुर्भुज असून देवी महिषासुर राक्षसाचा आपल्या हातातील त्रिशुलाने वध करते, असे दर्शविणारी आहे. अर्ध पशुरूप अर्ध मानवस्वरूपात महिषासुर फारच कमी मूर्तीत पाहायला मिळतो. देवीच्या डाव्या पायाजवळ सिंह आहे. हा सिंह हुबेहूब कदंब साम्राज्याच्या राजचिन्हासारखा दिसतो.

गोवा कदंब साम्राज्याचे राजचिन्ह सिंह होते. हा सिंह विशिष्ट शैलीचा होता; पण याचा फ़क्त एकच अवशेष आज गोव्यात शिल्लक आहे. पिलार सेमिनरिच्या संग्रहालयात हा पुरातत्वा अवशेष ठेवलेला आहे. या चिन्हाचे दुसरे उदाहरण बोरीतील नवदुर्गेच्या मूर्तीशेजारी आहे, असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. ही मूर्ती कदंब-होयसळ शैलीची असून १२ व्या शतकातील असावी. बोरिच्या या मंदिरात देवीला एका विशिष्ट शैलीचा पारंपारिक अलंकार केला जातो. याला कोकणीत "गंधा अलंकार" किंवा "गंधा पुजेचो अलंकार" म्हणतात. बकुळीच्या (ओवळां) काष्टाचे गंध उगाळून त्यामधे वेगावेगळे रंग घातले जातात. या रंगीत गंधातून देवांचे किंवा देवींचे अवयव दागिने दाखवले जातात. अशा -हेचा अलंकार फार कमी मंदिरात केला जातो. काही मंदिरात तर या पद्धतीचा अलंकार करण्याची प्रथा आता बंद केली आहे.

आपण सर्वजण मात्र या नवरात्रित श्री नवदुर्गा देवी चे दर्शन घ्यायला विसरु नका.

Saturday, October 1, 2011

Goa : Shri Mahalaxmi Devi Bandora (श्री महालक्ष्मी देवी बांदोरा, गोवा)

नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुरपूजिते
शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मे नमो S स्तुते ||

Shri Mahalaxmi Devi Bandora Goaफोंडा तालुक्यातील बांदिवडेत (Shri Mahalaxmi Devi Bandora) श्री महालक्ष्मी, श्री नागेश ही दोन प्रमुख दैवते आहेत. या गावात कदंब साम्राज्याचे अनेक ताम्रपत मिळालेले आहेत, तसेच दोन शिलालेख आढलेले आहेत. यातील एक शिलालेख श्री नागेशी मंदिराच्या बाहेर असून, त्यावर सन १४१३ ही तारीख आढळते. विजयनगर साम्राज्याचे राजा देवरा दूसरा यांचे आधिपत्य गोव्यावर होते, हे सांगणारा हा पहिला शिलालेख.

काहींच्या मते बांदिवडेची श्री महालक्ष्मी ही कोलवे गावाहून स्थलांतर केलेली आहे; पण ते सत्य नसल्याचे श्री नागेश देवालायाच्या समोरील शिलालेख स्पष्ट करतो. कोलवे गावच्या श्री महालक्ष्मीला बांदिवडे येथे स्थलांतर केल्याची गोष्ट खरी आहे; पण ती ही देवी नसून, त्या देवीची मूर्ती याच मंदिरातील गर्भाग्रुहात आहे. रामनवमीच्या दिवशी या देवीला मोठ्या रथात बसवून तो रथ नावापूरता काही अंतर ओढला जातो. दुस-या दिवशी सकाळी या मूर्तिबरोबर बांदिवडेच्या (Shri Mahalaxmi Devi Bandora) श्री महालक्ष्मीची उत्सवमूर्ती विराजमान होते हा रथ मंदिराभोवती ओढला जातो.

सासष्टी तालुक्यातील कोलवा या गावात पोर्तुगीजपूर्व काळात श्री महालक्ष्मीचे मंदिर होते. पोर्तुगिजांच्या inquisition म्हणजे बाटाबाटीला कंटाळून भक्तांनी या देवीला फोंडा तालुक्यातील तळावली या गावात आणली. या गावात काही काळ या देवीला ठेवली गेली. त्यानंतर तिचे स्थलांतर बांदिवडेच्या श्री महालक्ष्मीच्या मंदिरात करण्यात आले. ज्या ठिकाणी या तळावली गावात ही मूर्ती ठेवण्यात आली, त्या जागी आज मोठे मंदिर आहे. तसेच त्या देवीची आठवण म्हणून देवीची संगमरवरी पावले पुजली जात आहेत. या देवीची मूर्ती अत्यंत लहान असून ती घातूची आहे.

श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील मूळ मूर्ती पाषाणी असून त्यावर १५ व्या शतकातील कोरीवकाम दिसते. तरी ही मूर्ती नवीन असून ती जुन्या शैलीत बनवलेली आहे. खरेतर उद्या म्हणजे ०२ आक्टोबर'११ ला श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचे मी planning केले आहे. पण आपण गोवेकर या नवारात्रित (Shri Mahalaxmi Devi Bandora) श्री महालक्ष्मीचे दर्शन आवर्जून घ्यावे.

Goa : (Shree Shantadurgadevi Kunkulikarin, Fatorpa) श्री शांतादुर्गा देवी कुंकळळीकरीण, फातर्पा गोवा

अब्जावासे नमस्तुभ्यं चपलायै नमो नम:|
चंचलाई नमस्तुभ्यं ललितायै नमो नम: ||

श्री शांतादुर्गादेवी कवळे येथील दर्शन आटोपून आम्ही श्री शांतादुर्गा देवी कुंकळळीकरीण, फातर्पा इथे दर्शनासाठी येउन पोहोचलो. श्री शांतादुर्गा वेगवेगळ्या रूपात समावलेली आहे. (Shree Shantadurga Fatorpa) श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीणचे स्वरूप महिषासूर मर्दिनिचे असून हातात ढाल, तलवार, त्रिशूल भाला ही आयुधे असून पायाजवळ रेडा आहे. तसेच सामर्थ्याचे प्रतिक असलेला सिंह तिचे वाहन. अशी ही चैतन्यमय महामाया चांदी, सोने, मोती, ही-याच्या अलंकाराने लखलखणारी शक्ति पाहून भाविकांसमोर प्रकट झाल्याचा भास् होतो.

deepstambhमखरोत्सवाची सजावट करण्यासाठी मंदिराच्या चौकावर अंत्रालयाच्या द्वारासमोर छताला जाड लोखंडी आडवी दांडी बसवून जाड आकड्याला मखर टांगले जाते. या मखराची सजावट पारंपारिक दैवज्ञांकडून केली जाई. श्री शांतादुर्गा देवी कुंकळळीकरीणच्या दर्शनाला येणारे भाविक कळसाचे दर्शन घेउन मंदिराच्या पाय-यांना नमस्कार करून आपले लक्ष देवीच्या चरणाकडे केंद्रित करून कृपादृष्टि ठेवण्याची प्रार्थना करतात.

पंचमीच्या दिवशी भव्यदिव्य मखर रंगीबेरंगी फुलांनी विद्युत् रोषणाईने सजवून देवीची उत्सवमूर्ती मखराच्या मध्यभागी बसवली जाते. पंचमी ते महानवमीला मंदिरामधिल उत्सवी वातावरणास भजन, पुराण, किर्तनाने सुरूवात होते. दसरोत्सवापर्यंत हा ओसंड़ता उत्साह भाविकांच्या तनामनाला वेड लावून जातो. पंचमी ते नवमीपर्यंत प्रत्येक रात्री मखरातिल देवी सिंहारूढ झालेली असून महिषासूराचा वध करताना उग्र रूपात सामावलेली असते. उत्सवाची सुरूवात रात्री आकार उदंगीला तूप-साखरेचा नैवैद्य दाखवून, मंदिरात पुराण वाचून श्री खंडेरायाची वाजंत्रिच्या तालसुराने पालखीची मिरवणूक मंदिराभोवती काढली जाते. त्यानंतर गाभा-यातील देवीच्या मूर्तीची आरती होते. पुरोहित देवीची आरती करतो. समोरून चौकावर दोन्ही बाजुंनी बारा वांगडी भाविक बसलेले असतात. शहनाई, कासाळे, ढोल, ताशे या पारंपारिक वाद्द्यांच्या तालावर भव्यदिव्य मखर झुलवले जाते.

आपण सर्वांनी या नवरात्रोत्सवात Shree Shantadurga Fatorpa श्री शांतादुर्गादेवी कुंकळळीकरीण फातर्पा इथे भेट द्यावी.