Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Wednesday, January 25, 2012

Kanakeshwar : Valley of Flowers

सर्वसाधारणपणे हिवाळा सुरू झाला की शाळा-महाविद्यालयांची स्नेहसंमेलने सहली सुरू होतात. याच काळात कौटुंबिक सहलीदेखिल आयोजित केल्या जातात - ख़ास करून प्रेक्षणीय स्थळांना किंवा निसर्गरम्य ठिकाणांना भेटी दिल्या जातात. पावसाळा संपला की धरणी हिरवीगार झालेली असते. वृक्षवल्लरी फुलांनी बहरलेल्या असतात. त्यामुळे डोळ्यांना थंडावा देणा-या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येतो.

Kanakeshwar Temple Raigadh
रायगढ जिल्ह्यातील कनकेश्वर (Kankeshwar) परिसरही अप्रतिम अशा निसर्गसौन्दर्याने या काळात नटलेला असतो. भरपूर वनसंपदा लाभलेला हा परिसर "व्हँली आँफ़ फ्लावर्स" म्हणजेच "फुलांची दरी" या नावानेही ओळखला जातो. वैविध्यपूर्ण फुले हे येथील वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर वृक्षवेली, भाज्या प्राणीपक्षी यांचीही येथे भाउगर्दी पहावयास मिळते. हे सर्व निसर्गसौंदर्य पाहून मन कसे प्रफुल्लित होते.

डोंगरावर कनकेश्वराचे मंदिर आहे. पायथ्यापासून डोंगरावर मंदिराकडे जाण्यासाठी ७०० पाय-या चढाव्या लागतात. मापगावापासूनच पाय-या सुरू होतात. झिराड गावाकडून डोंगरावर जाण्यासाठी एक पायवाटही आहे. तिला कड्यावरची वाट असेही म्हणतात. पाय-यांपेक्षा ही कड्यावरची वाट सोईस्कर आहे. व्हँली आँफ़ फ्लावर्स हिवाळ्यात याच वाटेवरून पहावयास मिळते. परिसरातील जंगल देवराई म्हणून जतन केले आहे. अनेक दुर्मिळ वनस्पति फुले येथे पहावयास मिळतात. ड़ोंगरावरिल मंदिर परिसरात धर्मशाळेची सुविधा उपलब्ध आहे.

हिवाळ्यात या ड़ोंगरभागात तेरडा, अनंत, पोहा, तगर, बकुळी, गुलबक्षी, रानगुलाब, मोगरा, सोनचाफा ही फुले अधिक प्रमाणात पहावयास मिळतात. या फुलांचा सुगंध परिसरात दरवळत असतो. डोंगर पायथ्याशी हिरवीगार भातशेती फारच मनमोहक दिसते. शिवाय आजुबाजूला असणा-या तळ्यांमध्ये उमललेली कमळांची फुले पाहताना एका विलक्षण अनुभवाची प्रचिती येते. गुलमोहर, अग्निशिखा, भुई, आमरी, चुंबक काटा, युट्रिक्युलाँरिया, स्मिनिया अशी विविध प्रकारची फुले या परिसरात आपला सुगंध पसरवत असतात.

भाविक, पर्यटक, निसर्गप्रेमी, फुलवेड़े, चित्रकार, छायाचित्रकार आदी मंडळींची गर्दी येथे हिवाळ्यात अधिक असते. आंबा, सांग किंजल यांचे प्रचंड वृक्ष सरपटणारे प्राणी आणि टाकळा, मारंगी, कर्टली, पेंढरी या औषधि भाज्यादेखील या परिसरात पिकतात. निखळ निसर्गसौंदर्याचा अनुभव कनकेश्वर परिसरात उपभोगायला मिळतो. निसर्गसानिध्यात - दिवस राहून सारा ताणतणाव सारी मरगळ, सारा थकवा पळून जातो चित्तवृत्ति फुलारून येतात हे कनकेश्वर परिसराचे आणखी एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. तेव्हा रायगढ़ जिल्ह्यातील कनकेश्वराला भेट द्यायला विसरू नका.
Post a Comment