Showing posts with label Shri Mahalaxmi Devi Bandora Goa. Show all posts
Showing posts with label Shri Mahalaxmi Devi Bandora Goa. Show all posts

Saturday, October 1, 2011

Goa : Shri Mahalaxmi Devi Bandora (श्री महालक्ष्मी देवी बांदोरा, गोवा)

नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुरपूजिते
शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मे नमो S स्तुते ||

Shri Mahalaxmi Devi Bandora Goaफोंडा तालुक्यातील बांदिवडेत (Shri Mahalaxmi Devi Bandora) श्री महालक्ष्मी, श्री नागेश ही दोन प्रमुख दैवते आहेत. या गावात कदंब साम्राज्याचे अनेक ताम्रपत मिळालेले आहेत, तसेच दोन शिलालेख आढलेले आहेत. यातील एक शिलालेख श्री नागेशी मंदिराच्या बाहेर असून, त्यावर सन १४१३ ही तारीख आढळते. विजयनगर साम्राज्याचे राजा देवरा दूसरा यांचे आधिपत्य गोव्यावर होते, हे सांगणारा हा पहिला शिलालेख.

काहींच्या मते बांदिवडेची श्री महालक्ष्मी ही कोलवे गावाहून स्थलांतर केलेली आहे; पण ते सत्य नसल्याचे श्री नागेश देवालायाच्या समोरील शिलालेख स्पष्ट करतो. कोलवे गावच्या श्री महालक्ष्मीला बांदिवडे येथे स्थलांतर केल्याची गोष्ट खरी आहे; पण ती ही देवी नसून, त्या देवीची मूर्ती याच मंदिरातील गर्भाग्रुहात आहे. रामनवमीच्या दिवशी या देवीला मोठ्या रथात बसवून तो रथ नावापूरता काही अंतर ओढला जातो. दुस-या दिवशी सकाळी या मूर्तिबरोबर बांदिवडेच्या (Shri Mahalaxmi Devi Bandora) श्री महालक्ष्मीची उत्सवमूर्ती विराजमान होते हा रथ मंदिराभोवती ओढला जातो.

सासष्टी तालुक्यातील कोलवा या गावात पोर्तुगीजपूर्व काळात श्री महालक्ष्मीचे मंदिर होते. पोर्तुगिजांच्या inquisition म्हणजे बाटाबाटीला कंटाळून भक्तांनी या देवीला फोंडा तालुक्यातील तळावली या गावात आणली. या गावात काही काळ या देवीला ठेवली गेली. त्यानंतर तिचे स्थलांतर बांदिवडेच्या श्री महालक्ष्मीच्या मंदिरात करण्यात आले. ज्या ठिकाणी या तळावली गावात ही मूर्ती ठेवण्यात आली, त्या जागी आज मोठे मंदिर आहे. तसेच त्या देवीची आठवण म्हणून देवीची संगमरवरी पावले पुजली जात आहेत. या देवीची मूर्ती अत्यंत लहान असून ती घातूची आहे.

श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील मूळ मूर्ती पाषाणी असून त्यावर १५ व्या शतकातील कोरीवकाम दिसते. तरी ही मूर्ती नवीन असून ती जुन्या शैलीत बनवलेली आहे. खरेतर उद्या म्हणजे ०२ आक्टोबर'११ ला श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचे मी planning केले आहे. पण आपण गोवेकर या नवारात्रित (Shri Mahalaxmi Devi Bandora) श्री महालक्ष्मीचे दर्शन आवर्जून घ्यावे.