Monday, October 10, 2011

Goa : Shri Navdurga Devi, Madkai (श्री नवदुर्गा देवी, मड्कई, गोवा)

विद्यावंतं यशस्वंतं लक्ष्मीवंतं जन कुरू
रूपं देही जयं देहि यशो देहि द्विषो जहि ||
फोटो सौजन्य :
श्री नवदुर्गा संस्थान मड्कई, पोंडा, गोवा
Shri Navdurga Sansthaan Madkai, Ponda, Goa

मडकई येथील श्री नवदुर्गा संस्थानच्या नवरात्रोत्सवाच्या तयारीला महिनाभर अगोदरच सुरूवात होते. देवीचे मखर, जे मागल्या वर्षी नवरात्रोस्तवानंतर चौकावरच्या जागेवर ठेवण्यात येते, ते परत अत्यंत कुशलतेने खाली उतरविण्यात येते. मखर रंगविण्याचे हे कुशल काम बोरी-फोंडा येथील च्यारी कुटुंबियांकडून संस्थान करून घेते. कार्तिक महिन्यातला जत्रोत्सव आश्विन महिन्यातला नवरात्रोस्तव हे महत्वाचे उत्सव.

अंत्रुज महालातिल सर्व मंदिरांमधे नव्ररात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. भक्तगण मुद्दाम या मंदिरात जाऊन नवरात्रोस्तवाच्या मखराचे संचालन देवतांचे दर्शन घेतात. मडकईचा नवरात्रोस्तव आश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून आश्विन शुक्ल पक्ष नवमीपर्यंत साजरा करण्यात येतो. त्यामध्ये मुख्य आकर्षण असते ते मखरोत्सवाचे.


मडकईच्या नवरात्रोत्सवाची मूळ सुरूवात शके १८०३ मध्ये झाल्याची नोंद जाणकार मंडळिंकडून मिळते. नवरात्रोस्तवाला जे मखर वापरण्यात येते, त्याची निर्मिती शके १८०३ साली करण्यात आली असल्याची नोंद आढळते. नवरात्रोस्तवाची नोंद १९१० सालच्या संस्थानच्या नोंदवहित झालेली आढळते. या नोंदवहिमध्ये उस्तव कोणत्या दिवशी साजरा करायचा, याची विस्तृत माहिती नोंद केलेली आहे. नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस साजरा करण्यात येतो; पण आमच्या हिंदू पंचांगाप्रमाने नवरात्रोस्तव एके वर्षी आठ, नऊ किंवा दहा दिवशी साजरा करण्यात येतो त्याप्रमाणे उत्सवाची रूपरेषा ठरविली जाते.




Clip Courtesy : YouTube

मडकईच्या नवदुर्गा संस्थानच्या नवरात्रोस्तवाचे मुख़्य आकर्षण म्हणजे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नवदुर्गादेविची प्रत्येक दिवशी मखरात अश्वारूढ मारूतिवर आरूढ़, गाजारूढ़, मयुरारूढ़, गरूडारूढ, सिंहारूढ, भारूडारूढ (गंडभैवारूढ) आठव्या दिवशी, महानवमी दिवशी महिषासुरमर्दिनीच्या रूपात पूजा करण्यात येते. एकदातरी आपण सर्वानी या नवदुर्गादेविचे दर्शन घ्यावे.

No comments: