Powered By

Skin Design:
Free Blogger Skins

Powered by Blogger

Friday, September 30, 2011

Goa : Shri Shantadurga Kavlem (श्री शांतादुर्गा कवळे, गोवा)

|| सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोSस्तुते ||

shree shantadurga devi kawale
श्रीशांता विजयपदा विजयते दुर्गा हृदा तां भजे |
कुद्धौ शान्तियुतो कृतो हरिहरो कृत्वाSधिहस्ते यया ||
शांताये नमो नमो नहि परं यस्या ममाSलंबनम |
शांताया खलु किकरोSस्मी स्मतां तत्पादयोर्मे मना ||


shri shantadurgadevi kawaleमित्रांनो,

लवकरच नवरात्रीचे पर्व सुरु होत आहे. आपणा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मन:पुर्वक शुभेच्छा. आज संध्याकाळी मी, माझी फॅमिली आणि माझा मित्र गिरीश पालेकर फॅमिलीसह श्री शांतादुर्गादेवी, कवळे (Shree Shantadurgadevi, Kavlem, Goa) आणि श्री शांतादुर्गा देवी कुंकळळीकरीण, फातर्पा या ठिकाणी दर्शनाचा योग आला.

गोव्यातील सर्व भक्तजनांना नवरात्रीच्या निमित्ताने सहज दर्शनाचा योग आलेला आहे. आम्ही संध्याकाळी श्री शांतादुर्गादेवी, कवळे साठी दर्शनाला निघालो. होय! रस्ता चुकत चुकत गेलो पण शेवटी इच्छित स्थळी जाऊन पोहोचलोत.

shri shantadurga devi kawale goaफोंडा तालुक्यातील कवळे येथील श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर भव्य असून मंदिराची शैली चित्तवेधक आहे. या मंदिराच्या शिख़रावरील मनोरा अष्टकोनी असून बराच उंच आहे. त्यावर गोलाकार घुड आहे. या शिखरासारखे दुसरे शिखर गोव्यात इतर कोणत्याच ठिकाणी आढळत नाही. कवळेच्या मंदिरासमोर एक प्रचंड दीपस्तंभ आहे. त्याच्यामागे एक मोठा तलावदेखिल आहे. या देवीने शिव आणि विष्णू यांच्यामधे निर्माण झालेल्या वादाचे निवारण केले होते, म्हणून या देवीला श्री शांतादुर्गा असे संबोधण्यात आले, असे सांगतात. सध्या मंदिरात असलेली या देवीची मूळ मूर्ती धातुची असून ती समभंग मुद्रेत आहे. सन १८९८ मधे श्री शांतादुर्गेची मूळ मूर्ती पठाणांनी चोरून नेली. नवीन मूर्ती स्थापित करेपर्यंत मंदिराशेजारी असलेल्या गौडपादाचार्य मठातील देवीची मूर्ती या मंदिरात आणून स्थापन करण्यात आली.
१९ मार्च १९०२ साली नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. मठातून आणलेली ती मूर्ती त्याच गर्भग्रृहात ठेवण्यात आली आहे. देवी मूळ सासष्टी तालुक्यातील केळशी किंवा केळोशी गावची १५६० सालच्या पोर्तुगिजांच्या र्धमछळामुळे देवीला फोंडा तालुक्यातील सध्याच्या कवळे गावात आणली. आजदेखिल सासष्टिच्या केळशी गावात या देवीचे प्राचीन स्थळ आहे.

shree shantadurgadevi goa kawaleकवळेचे सध्याचे मंदिर नेमके कधी बांधले, याची नोंद आढळत नाही; पण १८ व्या शतकातसुध्दा या मंदिराची वास्तु उभी असल्याचे पुरावे आढळतात. १७६० साली हे देवालय नरोराम नावाच्या मंत्र्याने बांधून दिले. ते साता-याच्या छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात मंत्रिपद सांभाळत होते. नरोराम यांचे मूळ नाव नरोराम शेणवी. ते वेंगुर्ल्यानजीक असलेल्या कोचरे गावचे. आजदेखिल त्यांचा एखादा वंशज देवीच्या भेटीस आला तर त्याला मोठ्या मानाने देवालयात आणण्याचा परिपाठ आहे.

तर मित्रांनो, या नवरात्रिमधे श्री शांतादुर्गा देवी, कवळे
(Shree Shantadurgadevi, Kavlem, Goa) येथील दर्शन चुकवू नका!

श्री शांतादुर्गादेवी, कवळे फोंडा येथील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमासाठी (Shree Shantadurga navraatri utsav program) इथे क्लीक करा.
Post a Comment