सर्वस्वरुपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते |
भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमो S स्तुते ||
भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमो S स्तुते ||
केरी हे गांव पणजिपासून ३० किमी अंतरावर आहे. पोर्तुगीज काळात मुरगांव व सांकवाळ परिसर सासष्टी तालुक्याचाच एक भाग होता. म्हणून पोर्तुगिजांना सांकवाळ हा गांव सासष्टी तालुक्याबरोबर मिळाला. सोळाव्या शतकात inquisition ची चाहुल लागल्याबरोबर सांकवाळ गावची Shri Vijayadurga Devi Ponda Keri येथे स्थायिक झाली. केर हा शब्द मूळ कानडीतील असून पाणथळ जागा किंवा पाण्याची तळी किंवा पाणी असलेली जमीन असा त्याचा अर्थ आहे. Inquisition च्या काळात काही काळ विजयादुर्गा देवीची मूर्ती आगापूर येथील तळ्यात ठेवण्यात आली होती. आख्यायिकेनूसार एका भक्ताच्या स्वप्नात जाउन आपली स्थापना करण्याचे सांगितल्यावर देवीला आजच्या स्थळी स्थापन केले गेले. श्री विजयादुर्गेची प्राचीन मूर्ती ही आठव्या की नवव्या शतकातील होती. त्या मूर्तीची झीज झाल्यामुळे आजची नवी मूर्ती स्थापन करण्यात आली.
Picture Courtesy : Shri Vijayadurga Devi Mandir, Keri, Goa
पूराणानुसार पार्वतिने मंगेशाला सागून आगशीहून ती शंखवाळच्या दिशेने समुद्र दर्शनासाठी निघाली. त्या वेळी वाटेत तिला कालांतक नावाचा राक्षस सगळे गांव उध्वस्त करताना दिसला. त्या भक्तांनी देवीला साकडे घातले व आपला गाव व प्राण वाचविण्याची विनंती केली. देवीने उग्र रूप धारण करून या कालांतकावर वार केला. एकाच वाराने कालांतकावर देवीने विजय मिळवला आणि कालांतक खाली कोसळला. म्हणून या देवीला विजयादुर्गा असे संबोधले जाते. सद्ध्याचे विजयादुर्गेचे मंदिर १८ व्या शतकातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. मंदिराच्या शिखरावर गोल घुमट असून मंदिराच्या सर्व भिंतीवर प्राचीन कावी कला दिसून येते. या मंदिर समितीने अजूनही ही कला तशीच संवर्धन केलेली आहे. मंदिराला बाहेर एक कल्याण मंडप आहे. तोसुद्धा लाकडी व जुन्या शैलीचा. येथील एक आकर्षक उत्सव म्हणजे येथील नवरात्री व अंबारी उत्सव. या देवीचे नवरात्र देवी नवरात्राबरोबर होत नाही. एकदा अवश्य इथे भेट दया.